Re-NEET UG 2026 च्या निकालात रत्नागिरी जिल्ह्याने बाजी मारली आहे. जिल्ह्यातील भावेश सुरेश चव्हाण याने राज्यात प्रथम आणि देशात चौथा क्रमांक मिळवत वैद्यकीय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश नोंदवले आहे.
राष्ट्रीय परीक्षा संस्था NTA ने २१ जून २०२६ रोजी घेतलेल्या Re-NEET UG परीक्षेचा निकाल १६ जुलै रोजी जाहीर झाला. लातूर येथील संत तुकाराम नॅशनल मॉडेल ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या भावेशने या परीक्षेत ६६ गुण मिळवले. त्यामुळे त्याला ऑल इंडिया रँक ६५० मिळाली असून Re-NEET मधील ही राज्यातील सर्वोच्च आणि देशातील चौथी रँक ठरली आहे.
महाविद्यालयाने दिलेल्या माहितीनुसार यंदा Re-NEET साठी २०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील अनेक विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवले असून भावेशच्या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेत आणखी भर पडली आहे.
मूळचा रत्नागिरीचा असलेल्या भावेशच्या या कामगिरीबद्दल जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे. त्याच्या पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
