विश्वास आणि सहकार्याच्या बळावर पारदर्शकता, अखंड सेवा या ब्रीदवाक्यासह गेली ३३ वर्षे अविरतपणे समाजसेवा आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लि., चिपळूण या संस्थेच्या ३३ व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य सहकार मेळावा आणि प्रगतशील शेतकरी व यशस्वी व्यावसायिक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सोमवार, दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता संस्थेचे सहकार भवन, सभामार्ग, बहादूरशेख नाका, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथे होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. सुभाषराव चव्हाण हे राहणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. एस. बी. पाटील सेवा निवृत्त अपर आयुक्त तथा सहसचिव सहकार व पणन वस्त्रोद्योग मंत्रालय, मुंबई, श्री. मिलिंद सोबले सेवानिवृत्त
सहनिबंधक (पतसंस्था) सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे
श्री. राम कुलकर्णी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी, डॉ. श्री. सोपान शिंदे सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी, बाबासाहेब परिट (बिळाशी) आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ग्रामिण कथाकार हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
याच दिवशी संस्थेच्या वतीने सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले असून भाविकांसाठी तीर्थप्रसाद सकाळी ९.०० ते सायं. ४.०० पर्यंत सुरू राहणार आहे.
तरी या सहकार मेळाव्यास व सन्मान सोहळ्यास आपले ऋणानुबंध अधिक दृढ करण्यासाठी आपण अगत्य उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना प्रशांत यादव यांनी केले आहे.
