चिपळूण तालुक्यातील कुटरे गुरववाडी येथे सुरू असलेल्या गावठी हातभट्टीच्या दारू व्यवसायाचा सावर्डे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरववाडी येथे अवैधरित्या गावठी दारू विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता, उज्वला विजय जगदाळे यांच्या घरात 10 लिटर गावठी हातभट्टीची दारू आढळून आली. पोलिसांनी ही दारू जप्त केली आहे. या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्याच्या कॉन्स्टेबल दुर्वा जोशी यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीवरून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सावर्डे पोलीस ठाण्याचे निरीक्षक आबासो पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
