महायुती सरकार स्थापन झाल्यापासून रखडलेल्या रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. हे पद शिवसेनेकडे जाणार की राष्ट्रवादी काँग्रेसकडे यावरून जिल्ह्यात चर्चा सुरू असतानाच मंत्री भरत गोगावले यांनी मोठा दावा केला आहे.
“रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी मला आधीच ग्रीन सिग्नल मिळाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अधिवेशन संपल्यावर त्याची कागदोपत्री घोषणा करतील” असे गोगावले म्हणाले. यावेळी त्यांनी मिश्किल टिप्पणी करत म्हटले, “माझ्या कपड्यावरूनच तुम्ही समजून जा. आज मी हिरवा सदरा घातला आहे. याचा अर्थ पालकमंत्रीपद मलाच मिळणार.”
पुढील 15 दिवसांच्या आत किंवा 15 ऑगस्टपूर्वी रायगडला नवीन पालकमंत्री मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
