चिपळूण-संगमेश्वरच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी अभिमानाची बातमी आहे. संगमेश्वर येथील प्रसिद्ध दाम्पत्य डॉ. प्रदीप व डॉ. प्रीती खातू यांची कन्या डॉ. श्रिया आकाश रेडीज यांनी एम.डी.एस. पदवी यशस्वीरित्या संपादन केली आहे.
त्यांनी बाल व प्रतिबंधात्मक दंतचिकित्सा (Pediatric and Preventative Dentistry) या विषयात मास्टर ऑफ डेंटल सर्जरी ही पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. बालरोग दंतचिकित्सा हा अत्यंत संवेदनशील आणि विशेष कौशल्याचा विषय मानला जातो.
डॉ. श्रिया या डॉ. प्रदीप खातू आणि डॉ. प्रीती खातू यांची कन्या असून चिपळूण येथील डॉ. प्रसाद खातू यांच्या बहीण आहेत. तसेच त्या चिपळूण मधील उद्योजक श्री. वैभव नथुराम रेडीज यांच्या स्नुषा आहेत.
वडिलांचा वैद्यकीय वारसा पुढे नेत त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांच्यावर कुटुंबीय, गुरुजन आणि हितचिंतकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
