चिपळूण तालुक्यातील वालोपे गावातील बेंडकरवाडी येथील गेली 30 वर्षे रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. गावचे तरुण सरपंच तथा प्रशासक प्रतीक सुर्वे यांनी याप्रश्नी महत्वाची भूमिका बजावून ग्रामस्थाना न्याय मिळवून दिला.
वालोपे बेंडकर वाडी येथून जाणारा रस्ता काही कारणामुळे होऊ शकत नव्हता. रस्त्याची पुर्ण वाताहत झाली होती. एक दोन नव्हे तर तब्बल तीस वर्षे येथील ग्रामस्थांना रस्त्याच्या समस्येला तोंड द्यावे लागले होते. परंतु हा प्रश्न सरपंच श्री. सुर्वे यांनी पटलावर घेऊन सोडवला आहे. रस्त्याच्या कामात येणारे सर्व अडथळे त्यांनी ग्रामस्थांची बैठक घेऊन दूर केले. त्यामुळे या वाडीतील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करताना श्री. सुर्वे यांचे आभार मानले. या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाला असून यावेळी सरपंच श्री. प्रतीक सुर्वे यांच्यासह ग्रामसेवक विश्वास पवार ,माजी उपसरपंच समिधा कदम ,रविन्द्र आयरे ,तंटामुक्त अध्यक्ष राजेंद्र सोलकर, दीपक कदम, सर्व जागा मालक गंगाराम निर्मळ, भिकू सोलकर, प्रकाश सोलकर, दयानंद कदम, प्रकाश निर्मळ, प्रसाद चिपळूणकर, अनिल सोमण, धाकटु सोलकर , मंदार तांबट, आयोग सोलकर, कुंदन रेडीज, उदय शितफ,शरद शिंदे, विजय शिंदे,पांडुरंग कदम, महेश निर्मळ, संतोष निर्मळ, कैलास सोलकर,विकास सोलकर, संदेश सोलकर, रविन्द्र जडयाळ आदि ग्रामस्थ उपस्थित होते.
