रत्नागिरी शहरानजिकच्या खेडशी येथील दहावीतल्या मुलीने पेपर अवघड गेल्यामुळे राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवार 11 मार्च रोजी सायंकाळी 4 वा. सुमारास घडली.
अनुष्का अमित चिपरीकर (16, रा. स्वामीनगर खेडशी, रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. आज 10वी चा पेपर देऊन आल्यानंतर ती आपल्या रूम मधे गेली होती. काही वेळाने तिचे नातेवाईक तिच्या रूममध्ये गेले असता त्यांना अनुष्का फॅनला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. तसेच तिच्या डाव्या हातावर धारदार साधनाने ओरखडलेले दिसून आले. तीला खाली उतरवून तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तीला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.