मुंबई/चिपळूण : दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे यंदाही चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी ज्येष्ठ सिनेकलावंत नाना पाटेकर यांच्या निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले.
यावेळी केवळ दर्शनापुरतीच भेट मर्यादित न राहता दोघांमध्ये सामाजिक कार्यावर सविस्तर चर्चा झाली. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती नाना पाटेकर यांनी दिली. तर चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघात नदीतील गाळ काढणे, नदी संवर्धन आणि जलसंधारणाची कामे अधिक प्रभावीपणे कशी करता येतील, याबाबत दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाली.
पर्यावरण संवर्धन आणि समाजहिताच्या कार्याला एकत्रितपणे पुढे नेण्याबाबत या भेटीत महत्त्वपूर्ण विचारविनिमय झाल्याचे आमदार निकम यांनी सांगितले.
