गुहागर तालुक्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक अश्वनाथ बाप्पाजी खेडकर यांचे बंजारा समाजाच्या वतीने उत्साहात स्वागत आणि हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
यावेळी बंजारा समाज बांधवांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला. नवनियुक्त पोलीस निरीक्षक म्हणून आपल्या कार्यकाळात गुहागर तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत व्हावी, सर्वसामान्य नागरिकांना न्याय आणि सुरक्षिततेची भावना मिळावी आणि त्यांच्या कार्याला सदैव यश लाभो, अशा शुभेच्छा समाजाच्या वतीने देण्यात आल्या.
या स्वागत सोहळ्याला बंजारा समाजातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यामध्ये कॉन्ट्रॅक्टर मोहन चव्हाण, शिक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, कंटेश पवार, रमेश चव्हाण, अरविंद पवार, अविनाश पवार, नागेश पवार यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांनीही बंजारा समाजाने केलेल्या स्वागताबद्दल आभार मानले आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
