रायगड जिल्ह्याला अखेर नवा पालकमंत्री मिळाला आहे. राज्य सरकारने आ. भरत शेठ गोगावले यांची रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड जाहीर केली आहे. या निर्णयामुळे रायगड जिल्ह्यातील शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण आहे.
महाड, पोलादपूर, माणगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार असले भरत शेठ गोगावले हे विकासकामे आणि सामान्य जनतेशी असलेल्या थेट संपर्कासाठी ओळखले जातात. रायगडच्या सर्वांगीण विकासाला आता नवे गती मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
गोगावले यांच्या नावाची घोषणा होताच महाड, खेड, रायगडभर शिवसेना कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, पेढे वाटून आनंद साजरा केला. “भरत शेठ आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणा परिसरात घुमल्या.
रायगडच्या पर्यटन, उद्योग, शेती आणि पूरग्रस्त भागांच्या प्रश्नांसाठी गोगावले आक्रमकपणे काम करतील अशी अपेक्षा जिल्हावासियांना आहे.
