अतिशय सुंदर झालेल्या या कार्यक्रमात मातृपजून करुन आदर्शवत पायंडा पाडला गेला आहे, व्हिजन थ्री न्यूजच्या दहाव्या वर्धापनदिनी राजेंद्राचा पन्नासावा वाढदिवसही साजरा होत आहे, वाढदिवस अनेकजण साजरा करतात पण आज विविध क्षेत्रातील सामाजिक कार्य करणा-याना पुरस्कार देऊन आपला वाढदिवस साजरा करणा-या राजेंद्रने आपला वाढदिवस सार्थकी लावला असे गौरवोद्गार या सोहळ्याचे मुख्य अतिथी लोकप्रिय आमदार श्री.शेखर निकम यांनी काढून व्हिजन थ्री न्यूजच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करुन त्यांनी शुभेच्छा दिल्या.
व्हिजन थ्री न्यूजच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित आयोजित करण्यात आलेला लोकप्रेरणा गौरव पुरस्कार सोहळा २०२६ आणि संपादक श्री, राजेंद्रकुमार शिंदे यांच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमासाठी सह दुय्यम निबंधक वर्ग २ श्रीमती स्मिता गुरनुले, ज्येष्ठ पत्रकार सतीश कदम, मा.शिक्षण विस्तार अधिकारी श्री .रमाकांत पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्चलनाने आणि मातृपूजनाने झाली, यावेळी राजेंद्रकुमार शिंदे यांच्या मातोश्री आणि सासूबाई यांचे शिंदे पतीपत्नी यांनी व्यासपीठावर पाद्य पूजन केले. यावेळी उपस्थित सर्वजण या नाविन्यपूर्ण आणि हदयस्पर्शी सुरवातीने भारावून गेले.
श्री. राजेंदकुमार शिंदे यांनी आपल्या प्रस्तावनेमध्ये दहा वर्षांच्या व्हिजन थ्री न्यूजच्या वाटचालीसह पन्नास वर्षांच्या आयुष्याचा थोडक्यात आढावा घेऊन सर्वांप्रती कतज्ञता व्यक्त केली, यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. श्री.शिंदे यांना सुखदुखात कायम साथ देणा-या त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.ऋतुजा शिंदे यांचाही विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. पुरस्कारार्थी श्री .महादेव दत्ताराम चव्हाण यांना लोकप्रेरणा जनसेवा गौरव पुरस्कार, श्री भास्कर रामचंद्र कदम यांना लोकप्रेरणा ज्ञानरत्न पुरस्कार, श्री. प्रमोद शंकर ठसाळे यांना लोकप्रेरणा प्रशासकीय रत्न पुरस्कार , श्री. प्रकाश अनंत गांधी यांना लोकप्रेरणा सामाजिक सेवा गौरव पुरस्कार , श्री. नयनिश रमेश गुढेकर यांना लोकप्रेरणा पक्षीमित्र गौरव पुरस्कार, श्री. सतीश रजनीकांत जाधव यांना लोकप्रेरणा मनोदीप ज्ञानगौरव पुरस्कार , श्री. विलास दत्ताराम महाडिक यांना लोकप्रेरणा कोकण गौरव पुरस्कार, श्री. मकरंद माधव भागवत यांना लोकप्रेरणा निर्भीड लेखणी गौरव पुरस्कार, श्रीमती रंजिता विजय ओतारी यांना लोकप्रेरणा नारी शक्ती गौरव पुरस्कार ,श्री. अनिकेत सुधीर जाधव यांना लोकप्रेरणा युवा गौरव पुरस्कार मोठ्या जल्लोषात प्रदान करण्यात आला, सह दुय्यम् निबंधक स्मिता गुरनुले यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाचे कौतुक करुन राजेंदकुमार शिंदे यांच्यासह सर्व पुरस्कारार्थीचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ पत्रकार सतीश कदम यांनी शिंदे यांच्या पत्रकारिता आणि सामाजिक कार्याचा उल्लेख करुन एकत्रितपणे केलेल्या कामाची माहिती दिली. शिक्षण विस्तार अधिकारी श्री.रमाकांत पवार यांनीही शिंदे यांचे विशेष कौतक करीत त्यांना पढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यकमासाठी खास उपस्थित असलेल्या रत्नागिरी आकाशवाणीच्या रेडीओ सखी आणि नाट्य कलाकार सौ.पल्लवी गोडसे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला, कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये कार्यक्रमाचे कौतुक करुन वर्धापन दिनाच्या आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. व्हिजन थ्री न्यूज वर्धापन दिनाचा आणि वाढदिवसाचा केक कापून दुहेरी आनंद सजरा करण्यत आला. यानंतर श्री शिंदे यांना उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या, यावेळी चिपळूण नगर परिषदेचे नगरसेवक शशिकांत मोदी, नगरसेवक श्री.फैसल कास्कर, नगरसेवक श्री.अजय भालेकर, नगरसेवक श्री.अंकुश आवले, नगरसेवक श्री.विकी नरळकर, नगरसेविका सौ.अंजली कदम, मुख्याधिकारी श्री.संजय जाधव, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, उद्यान विभाग अधिकारी प्रसाद साडविलकर, आरोग्य विभाग अधिकारी वैभव निवाते, अर्बन बँकेचे माजी चेअरमन सतीशआप्पा खेडेकर, माजी नगरसेवक शिरीषभाऊ काटकर, माजी नगरसेवक परिमल भोसले ,शिवसेना शहर अध्यक्ष सचिन तथा भैय्या कदम, शिवसेना जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन चोरगे, प्रसिध्द बांधकाम व्यवसायिक राजेश वाजे, माजी नगरसेवक रमेश खळे, माजी उपनगराध्यक्ष लियाकत शाह, सरपंच शशिकांत राऊत, माजी नगरसेवक विजय चितळे, पूनम भोजने, राजाभाऊ कदम, ज्येष्ठ पत्रकार जावेदभाई मुजावर, नाभिक समाजोन्नती संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय जाधव , शहर अध्यक्ष पंढरीनाथ चव्हाण, सुरेश राऊत, मा.उपसरपंच साताप्पा जाधव, माजी सरपंच सारिका जाधव, राज्य उत्पादन शुल्क चिपळूण निरीक्षक सुनिल आरडेकर, अर्षद शेख, राजूशेठ जोईल, ना.स.तालुका सरचिटणीस संदीप शिंदे, प्रतिष्ठान अध्यक्षा रविना गुजर, प्रसिध्द उद्योजक महेंद्र शर्मा, महिला अध्यक्षा उज्वलाताई कदम, सामाजिक कार्यकर्ते राजन खेडेकर, संत श्रीसेना महाराज प्रतिष्ठानचे सचिव मुख्याध्यापक महेंद्र साळुंके, प्रा.सुहास बारटक्के, माजी नगरसेवक बरकत वांगडे, सामाजिक कार्यकर्ते सुयोग चव्हाण, यांच्याबरोबर चिपळूणसह सांगली, कोल्हापूर, मुंबई, रत्नागिरी येथून विविध क्षेत्रातील शेकडो मान्यवर, मित्रमंडळी, समाजबंधू, नातेवाईक तसेच गोल्डन गृप, ओबामा गृप, स्पेशल फ्रेंड गृप, म्युझिक लवर्स गृप, पत्रकार बंधु आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिशय सूत्रबध्द आणि नेटके आयोजन करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेवढ्याच जल्लोषात श्री.शाहीद खेरटकर यांनी तर आभार प्रदर्शन कु अवधूत शिंदे यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्हिजन थ्री न्यूज परिवार, अभिष्टचिंतन समितीचे अभिजीत खेडेकर, विशाल राऊत, संतोष चव्हाण, अनिल घाग, बाळा ओतारी. राजेश सावंत, विनोद शिंदे, मनोज जाधव, रविंद्र भोजने, हसमुख पटेल, समीर जानवलकर, दिनेश रेडीज, निलेश शिंदे, नरेंद चव्हाण, विनय मोहिते, दिपक शिंदे, दिगंबर सुर्यवंशी, अवधूत शिंदे, ऋतुराज शिंदे, सौरभ शिंदे, शुभम शिंदे, सौ.सुप्रिया ओतारी, सौ. श्रुती जोशी, सौ मनाली जाधव आणि गोल्डन मेमोरियल गृप यांनी विशेष परिश्रम घेतले. तर श्रीनाथ खेडेकर, मानस संसारे, प्राची ओतारी, रिगल महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनीही कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य केले.
